जिवती तालुका म्हणजे अनेक समस्यांच्या माहेर घर
जिवती तालुका म्हणजे अनेक समस्यांच्या माहेर घर
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर/जिवती : माणिकगड पहाड अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून या समस्यांकडे शासन प्रशासन लक्ष देतील का ? लक्ष देऊन समस्या दूर करणार का ? शासन प्रशासन यांना अती दुर्गम असलेल्या जिवती तालुक्याची परिस्थिती जाणवत का नाही, खुर्ची फक्त झोपा काढायला मिळाल्या की काय, प्रशासन इतके झोपी गेल्यासारखे वर्तणूक शेवटी करत आहे तरी कशासाठी ? जिवती तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भासत असल्याचे जाणवत आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व तालुकावासियांच्या प्रश्नांचे निवारण करणार तरी कोण ?
शेतकऱ्यांना आतापर्यंत अर्थसहाय्य निधी मिळाली नाही अर्थसहाय्यची निधी केव्हा मिळणार अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन नसल्यामुळे फार्मर आयडी बनली नाही, शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जे लाभ मिळणार आहे, त्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे, कारण ३१ मार्च शेवटची तारीख असल्यामुळे कोणताही ठोस उपाय काढण्यात आला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
ऑफलाइन फार्मर आयडी शासन प्रशासनाने स्विकारावी अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे. रेती अभावामुळे जलजीवन मिशनचे काम रेंगाळले असल्यामुळे तालुक्यातील लोकांची तहान भागलेली नाही. शासनाने गाजावाजा करून अनेक योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर केले असून घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून १५००० हजार रुपये प्राप्त झाले, परंतु रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे घरकुलाचे काम ठप्प झाले आहे.
वन विभागाच्या जाचक अटीमुळे तालुक्यातील विकास खुंटला असल्यामुळे कोद्देपूर, गुडसेल, जिवती येथील तलावाचे काम वन विभागाने अडथळा निर्माण केल्यामुळे सन १४-१५ पासून बंद पडलेले आहे. वन विभागाकडून नाहरकत मिळत नसल्याने जिवती नगरपंचायत हद्दीतील ६६४ घरकुलाची यादी धुळखात पडली आहे.
तालुक्यातील अनेक रस्ते उखडले गेले आहेत, यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोजच तालुक्यात कुठे ना कुठे अपघात होत असल्याचे ऐकण्यात येत आहे. मात्र, गिट्टी उघडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने रस्त्याच्या खड्ड्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात एकही उद्योगधंदे नसल्यामुळे सुशिक्षित युवा पिढी पुणे, मुंबई, हैद्राबाद यासारख्या ठिकाणी जाऊन पोटाची खळगी भरत आहे. तालुक्यात उद्योग कारखाने उभारण्यात यावे, तालुक्यात एक नाही तर अनेक समस्या आवर्जून उभे असून या सर्व समस्यांच्या तोडगा काढण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत